Sunday, October 26, 2008

हरवलेली माणसे - lost

हरवलेली माणसे
-------------------

फार पूर्वी TV वर एक प्रोग्राम लागायचा - " आपण यांना पाहिलात का ?"
त्यात कुठे कुठे हरवलेली माणसे दाखवायचे. आणि आता TV बंद करायची वेळ झाली ही सूचना नकळत मिलायाची.

असाच विचार करताना मला एकदम आठवण झाली की कुठे जात असतील हे हरवलेले लोक?

हरवलेली माणसे नक्की कुठे जातात?माणूस हरवतो म्हणजे नक्की काय होते?
काय करतात त्यांच्या घरातले? अचानक आपले माणूस असे नाहीसे झाले की कसे वाटत असेल?

आपण नाही का जाहिराती बघतो -"हरवला आहे. वय - १४ वर्षे. सावला रंग. कृपया संपर्क साधावा - " आणि एक फ़ोन नम्बर .
बाहेरच्या अफाट जगात आपले कुणीतरी फसलेले आहे, माणसांच्या जंगलात कुठे तरी अडकलेले आहे ही किती असहाय्य भावना असेल.

माणसे रोज येतात आणि जातात. रेलवे स्टेशन , बस स्टॉप, सिनेमा घर अशा असंख्य ठिकाणी अगणीत लोक आपल्याला रोज दिसतात. त्याम्ध्येच असतात का हे हरवलेले लोक ? असा विचार केला की रोजचेच बिन चेहेरयाचे चहरे अचानक ओळखीचे वाटायला लागतात.
शून्य नजरेने कुठे तरी टक लावून बघणारा तो कोपर्यावरचा वेडसर मनुष्य कुठून आला असावा हा विचार दिवसभर डोक्यात घुमत राहतो. आणि संध्याकाळी त्याचा वेडसर चेहरा तितकासा वेडसर वाटत नाही.

बाकड़यावर दिवसभर बसून राहणारे कुणी वृद्ध गृहस्थ कुठूनसे आले असावे? ते दुपरिसुद्धा तिथेच का बसून असतात?

भिरभिरत्या नजरेने आजुबाजुला बघणारी छोटी मुले - नेहेमीच कशी स्टेशन वर पडलेली असतात ? "हट" असे म्हणुन जेव्हा आपण त्यांना झिडकारून लावतो, तेव्हा त्यांना कसे वाटत असेल?
घरी जायचे असुनही ज्यांना घरी जाता येत नाही, अशी छोटी मुले काय करतात?

आपण असे सगळ्या जगात एकटे. कोण कुठले काहीच कल्पना नाही. केवळ "अन्तर" ही एकाच मिती उरते मग.
हे किती विचित्र आहे !

मला माहीती नाही. पण "हरवलेली माणसे" ही कल्पनाच फार भयानक आहे.

Friday, October 10, 2008

एक दुर्घटना - Accident

Now.. It doesn't take a nuclear reactor to create a mishap. Marvels of modern technology can do it within no time.

I mean it was all going perfectly. In fact a matter of few minutes and it would be over.
But the regular stuff went horribly wrong.
Poor creature was melted after keeping it inside a Grill at about 350 degrees Fahrenheit.
We tried rescue efforts but it was already too late.
The thing had taken 33rd degree burns and was deformed beyond recognition.

We had to believe our eyes somehow and console ourselves.
It was a fine blue plastic dish before going in !!!!

This is what happens when you keep a plastic dish in a grill.
The dangling tentacle looking thing is molten plastic.
I am really choked up to continue writing !

Song I liked : [Phir se udd chala (RockStar)]

Rockstar is special movie. It took some time to grow on and appreciate. Ranbir (JJ/Jordan) is an aspiring singer who's not so ser...